YCMH News : मृतदेह अदला-बदली प्रकरणी सफाई कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी

एमपीसी न्यूज – वायसीएम रूग्णालयात शवविच्छेदन करून झाल्यानंतर मृतदेहाची अदला-बदल झाल्याप्रकरणी एका सफाई कर्मचाऱ्याची विभागीय चौकशीचे आदेश आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले (YCMH News) आहेत.

किसन नागू नांगरे असे विभागीय चौकशी सुरू केलेल्या सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे. भिंत कोसळून गंभीर जखमी झालेल्या दापोडीतील एका महिलेचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्या महिलेचे शव विच्छेदन करण्यासाठी वायसीएम रुग्णालयातील डेड हाऊसमध्ये आणण्यात आले होते.

 

Pune Crime News : भरघोस कमिशनचं आमिष दाखवून पुण्यातील महिलेची 19 लाखांना फसवणूक

शव विच्छेदन करतेवेळी त्याठिकाणी तीन महिलांचे मृतदेह होते. त्यामुळे शव विच्छेदन करून झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याकडून मृतदेहाची अदला-बदल झाल्याचा धक्कादायक प्रकार 19 ऑक्‍टोबर 2022 रोजी समोर आला होता. या प्रकारामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या केबिनची तोडफोड देखील केली होती.

या प्रकरणाची आयुक्त सिंह यांनी गंभीर दखल घेत अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. समितीने आयुक्त सिंह यांना अहवाल सादर करून कारवाईची शिफारस केली होती.

किसन नांगरे हे वायसीएममधील शवागृहात महत्वाचे कामकाज सोपविण्यात आलेले आहे. नांगरे यांनी कामकाजात हलगर्जीपणा करून मृतदेहाची अदला-बदल झाली. त्यामुळे नांगरे यांनी कर्तव्याप्रती नितांत सचोटीचे पालन केले नसून पालिकेची जनमाणसात प्रतिमा मलीन झाली.

नांगरे यांची विभागीय चौकशी करण्याची शिफारस समितीने केली होती. त्यानुसार नांगरे (YCMH News) यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत. या आदेशाची नांगरे यांच्या सेवा पुस्तकात नोंदही करण्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.