Dapodi Crime News : सीएमई परिसरात चंदनाच्या झाडांची चोरी करणारा अटकेत

एमपीसी न्यूज – दापोडी येथील मिलिटरी अभियांत्रिकी महाविद्यालय (सीएमई) परिसरात चंदनाच्या झाडांची चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस (Dapodi Crime News ) आला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 25) मध्यरात्री पावणेदोन वाजताच्या सुमारास मिडल लेक येथे करण्यात आली.

बबन मनोहर कडाळी (वय 40, रा. आंबेगव्हाण, ता. जुन्नर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह बंडू मदे (वय 30, रा. वांगदरी, जि. अहमदनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ईश्वर मधुकर पवार (वय 33, रा. सीएमई दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

YCMH News : मृतदेह अदला-बदली प्रकरणी सफाई कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार आणि त्यांचे सहकारी हे सीएमई परिसरात गस्त घालत असताना मिडल लेक येथे चंदनाच्या झाडांची चोरी होत असल्याचा प्रकार निदर्शनास आला. पवार यांनी आरोपी बबन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चंदनाच्या झाडाचे कापलेले सहा तुकडे, चंदनाचा गाभा, कुऱ्हाड, करवत असा एकूण 23 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला (Dapodi Crime News ) आहे. पवार यांनी आरोपी बबन याला भोसरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.