Yerawada : येरवड्यात सैराटची पुनरावृत्ती; प्रेमविवाह केल्याने तरुणीवर धारदार कोयत्याने वार

एमपीसी न्यूज : पुण्यातील येरवडा परिसरातून (Yerawada) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमविवाह केल्याने चाळीत राहणाऱ्या काही सराईत गुन्हेगारांनी एका 20 वर्षीय तरुणीवर कोयत्याने वार केले. येरवड्यातील मच्छी मार्केट परिसरात गुरुवारी रात्री ही घटना घडली. येरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जय अँथोनी, अनिकेत जगन्नाथ काकडे, गणेश जगताप आणि सोनू उर्फ रॅडो अशी आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपींना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. मारहाण झालेला तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मच्छी मार्केट परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वीच या तरुणीने एका तरुणांसोबत आळंदी प्रेमविवाह केला होता. याचा राग आरोपीच्या मनात होता. यावरूनच आरोपीने या तरुणीला मारहाण केली.

PCMC: एमएनजीएलची रस्ते खोदाई शुल्क सवलत रद्द

गुरुवारी (Yerawada) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी या तरुणीला गाठत ‘तू साठ्याच्या पोराशी का लग्न केले, आता तुला सोडणार नाही’ असे म्हणून धारदार शस्त्राने या तरुणीवर वार केले. मात्र सुदैवाने ही तरुणी बचावली.येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून चारही आरोपींना अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.