Bhosari : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार तरुणाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 11) रात्री पावणेबाराच्या सुमारास जुना जकात नका, फुगेवाडी येथे घडली.

जीवन बालाजी कांबळे (वय 30, रा. दापोडी. मूळ रा. हाडोळी, ता. चाकूर, जि. लातूर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर डी तापकीर यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवन त्यांच्या दुचाकीवरून मंगळवारी (दि. 11) रात्री पावणे बाराच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावरून दापोडी येथून जात होते. जुना जकात नाका येथे अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये जीवन गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

रिक्षाची रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या वाहनाला धडक; प्रवासी दांम्पत्य जखमी

रिक्षाचालकाने रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात रिक्षा चालवली. रिक्षाची रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या वाहनाला धडक बसली. यामध्ये रिक्षामधून प्रवास करणारे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. हा अपघात 26 जानेवारी 2019 रोजी पुणे नाशिक रोडवर मोशी येथे मुनलाइट हॉटेलसमोर झाला. ज्योती अशोक भानगे (वय 56, रा. शिरूर) आणि त्यांचे पती अशोक भानगे हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी ज्योती यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एम एच 12 / एच सी 1308 या रिक्षा चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.