Chikhali : पीएमपी बस खाली चिरडून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या पीएमपी बस खाली चिरडून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 31) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास साने चौक चिखली (Chikhali) येथे घडली.

Pimpri : एचए स्कूलच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांकडून इस्रोचे आभार

विठ्ठल धोंडीराम अर्जुने (वय 19, रा. शरदनगर, चिखली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संग्राम धोंडीराम अर्जुने (वय 23) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीएमपी बस चालक सुनील सुभाष दुधाळकर (वय 27, रा. रुपीनगर तळवडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल अर्जुने हे घरगुती सामान आणण्यासाठी त्यांच्या पल्सर (एमएच 14/जेजी 2592) दुचाकीवरून जात होते. साने चौकात आल्यानंतर भरधाव वेगात जाणाऱ्या पीएमपी (एमएच 14/एचयु 4796) बसने विठ्ठल यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये विठ्ठल हे रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्यावरून पीएमपी बसचे चाक गेले. त्याखाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्र आणि चिखली उपकेंद्र येथील दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाच्या जवानांनी रस्त्यावरील रक्ताचे डाग पाणी मारून धुऊन काढले. या अपघातामुळे साने चौक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.