Pimpri : एचए स्कूलच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांकडून इस्रोचे आभार

एमपीसी न्यूज – डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित पिंपरी येथील हिंदुस्थान (Pimpri) अँटिबायोटिक्स स्कूल प्राथमिक विभागात शुक्रवारी (दि. 1) चंद्रयान 3 च्या यशाबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ( इस्रो) चंद्रावर पाठवलेले चांद्रयान यशस्वीपणे चंद्रावरती अवतरले. शास्त्रज्ञांच्या या यशाबद्दल देशभरातून कौतुक होत आहे. त्यातच पिंपरी येथील एच ए स्कूलच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांचे आभार मानत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.

Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे लोकसभा निवडणुक लढवावी – संजय काकडे

शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या संकल्पनेतून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांकडून ‘Thank You ISRO’ च्या आकारात बसून चांद्रयान तीन यशस्वी करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि सहकाऱ्यांना विद्यार्थ्यांकडून एक मोठा धन्यवाद देण्यात आला.
आम्हीही शास्त्रज्ञ होणार, आम्हीही जगामध्ये देशाचे नाव मोठे करणार ही प्रतिज्ञा घेण्यात आली. यामध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जेष्ठ शिक्षक अर्चना गोरे, डॉ. विठ्ठल मोरे यांनी मार्गदर्शन केले.
क्रीडा शिक्षक जॉन स्वामी, सीमा हांगे, शुभांगी गवारी, रूपाली जाधव, योगेश आंबेकर यांनी नियोजन (Pimpri) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.