Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे लोकसभा निवडणुक लढवावी – संजय काकडे

एमपीसी न्यूज – भाजपचे नेते पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक (Pune) लवकरच जाहीर होईल,अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. मात्र अद्यापपर्यंत निवडणुक आयोगामार्फत कोणत्याही प्रकारचा पुणे लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला नाही. त्याच दरम्यान भाजपचे नेते सुनील देवधर हे पुणे लोकसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा काल सोशल मीडियावर रंगली होती. या चर्चेला काही तास होत नाही. तोवर आज सकाळपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे लोकसभा निवडणुक लढविणार अशी चर्चा पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

 या चर्चेवर भाजपचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे लोकसभा निवडणुक लढवावी अशी मी पत्राद्वारे मागणी केली आहे. पुण्यामधून नरेंद्र मोदी यांनी निवडणुक लढविल्यास महाराष्ट्रात सर्वाच्या सर्व 48 जागा भाजप जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच ते पुढे म्हणाले की,मागील 9 वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आपला देश प्रगती पथावर आहे. अनेक देशात नरेंद्र मोदी यांचे स्वागत आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.
त्याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशभरातील विरोधक एकत्रित आले असून काही महिन्यापासून अनेक बैठका घेतल्या जात आहेत.
मात्र त्या बैठकीचा काही एक उपयोग होणार नसून आमच्या पक्षाला अधिक फायदा होणार आहे. विरोधकांना स्वतः च्या कुटुंबाची काळजी आहे.तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील प्रत्येक कुटुंबाची काळजी असल्याच मागील 9 वर्षातील कारभारामधून दिसले आहे.

त्यामुळे एकूणच आज सकाळपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे लोकसभा निवडणुक लढणार अशी चर्चा ऐकली. त्यावर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे मागणी केली आहे. आपण पुणे लोकसभा निवडणुक लढवावी. आमच्या सारखे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करतील आणि सर्वाधिक मतांनी आम्ही तुम्हाला निवडून आणू असे पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की,महाराष्ट्रामधील 48 पैकी 45 जागा आम्ही जिंकू असा आजपर्यंत आमचा अंदाज आहे. पण जर नरेंद्र मोदी पुण्यामध्ये आल्यास राज्यातील सर्वच जागा भाजप जिंकणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे लोकसभा निवडणुक लढणार अशी चर्चा सुरू झाल्यावर कसबा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार रविंद्र धंगेकर हे मोदी विरोधात निवडणुक लढविण्याची इच्छा बोलवून दाखवली आहे. त्यावर संजय काकडे म्हणाले की,आपल्या देशात लोकशाही आहे.
त्यामुळे कोणाच्याही विरोधात कोणी निवडणुक लढवू शकते. त्यामुळे रविंद्र धंगेकर यांना लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा,पण नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कोणी ही थांबले.तर त्याच डिपॉझिट जप्त झाल्या शिवाय राहणार नाही अशी भूमिका देखील यावेळी त्यांनी (Pune) मांडली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.