Chikhali Crime – ऑनलाईन टास्कद्वारे महिलेची पाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ऑनलाईन कामाचे टास्क पूर्ण करण्यास (Chikhali Crime) सांगून महिलेची पाच लाख पाच हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 16 ते 16 एप्रिल या कालावधीत आळंदी रोड, चिखली येथे घडला.

याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : डीलरशीप देण्याच्या बहाण्याने पावणे दोन लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला कामाचे टास्क पूर्ण करण्यासाठी म्हणून सुरुवातीला एक हजार रुपये भरण्यास सांगितले. ते काम पूर्ण केल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून 900 रुपये देण्यात आले. यामध्ये फिर्यादीचा या कामावर विश्वास बसला. त्यांनतर आरोपींनी फिर्यादीला आणखी काम देऊन त्या कामासाठी सुरुवातीला लागणारे पैसे घेतले.

काम पूर्ण झाल्यानंतर देखील त्याचे पैसे न देता फिर्यादीची पाच लाख पाच हजार 332 रुपयांची (Chikhali Crime) फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.