Pune : त्यामुळे वज्रमूठ सभेच्या तारखा बदलण्याचा निर्णय – जयंत पाटील

एमपीसी न्यूज : उन्हाळ्यामुळे वज्रमूठ सभा घेणे (Pune) अवघड होणार आहे. त्यामुळे वज्रमूठ सभेच्या तारखा बदलण्याचा निर्णय अनौपचारिकपणे 1 मे रोजी संध्याकाळी उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण,अजित पवार, नाना पटोले यांच्या उपस्थितीत व्यासपीठावर झाला आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. त्यामुळे अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत.

Chikhali Crime – ऑनलाईन टास्क द्वारे महिलेची पाच लाखांची फसवणूक

त्याच (Pune) दरम्यान राज्यभरात महाविकास आघाडीच्या वतीने वज्रमूठ सभा घेतली जात आहे. त्या सभांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण कालच्या शरद पवार यांच्या निर्णयामुळे 14 तारखेला पुण्यात होणारी वज्रमूठ सभा रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.