Pimpri : किरकोळ कारणावरून तरुणावर ब्लेडने वार

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून चार जणांनी मिळून तरुणावर ब्लेडने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि. 30) रात्री सव्वाआठच्या सुमारास पिंपरी येथे घडली.

सागर विशाल पवार (वय 20, रा. पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भरत (पूर्ण नाव पत्ता माहीती नाही) व त्याचे तीन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर गुरुवारी रात्री त्याच्या मित्रांसोबत पिंपरी मधील हेमू कॉलनी गार्डन जवळून जात होता. त्यावेळी आरोपी भरत त्याच्या इतर तीन साथीदारांसोबत आला. भरत आणि सागर यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. यात आरोपींनी हाताने मारहाण करत शिवीगाळ करून सागर वर ब्लेडने वार केले. यामध्ये सागरच्या चेहऱ्यावर व दंडावर गंभीर दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.