Wakad : ओएलएक्स वरून कार विकण्याच्या बहाण्याने दोघांनी घातला पावणेदोन लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – ओएलएक्स वर कार विकण्याची जाहिरात टाकली. एकाने ती कार खरेदी करण्यासाठी पसंती दिली. दोघांनी मिळून त्याच्याकडून 1 लाख 82 हजार 100 रुपये रोख आणि ऑनलाइन स्वरूपात घेतले. आणि कार न देता फसवणूक केली. हा प्रकार कोरेगाव पार्क, नांदेड सिटी सिंहगड रोड, काळेवाडी फाटा रहाटणी येथे 23 मे ते 23 जून या कालावधीत घडली.

संतोषकुमार जनार्दन प्रसाद (वय 32, रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रशांत एस (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांची (एमएच 12 केटी 9160) ही व्हेंटो कार विकायची असल्याची जाहिरात ओएलएक्स वर दिली. ही जाहिरात पाहून संतोषकुमार यांनी आरोपींशी संपर्क केला. आरोपी प्रशांत याने त्याच्या बँक खात्यावर ऑनलाइन माध्यमातून पैसे भरण्यास सांगितले. तसेच आरोपीच्या एका साथीदाराने संतोषकुमार यांना भेटून त्यांची कागदपत्रे आणि रोख रक्कम घेतली. संतोषकुमार यांनी आरोपींना एकूण 1 लाख 82 हजार 100 रुपये दिले. आरोपींनी पैसे घेऊन देखील कार न देता फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.