Pune : डॉ. एस. एन. पठाण यांच्या सत्तरीपूर्ती निमित्त गुरुवारी अभीष्टचिंतन सोहळा

एमपीसी न्यूज- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. एस . एन . पठाण यांच्या वयाच्या सत्तरी पूर्ती निमित्त पुण्यात अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (दि. 4) अल्पबचतभवन सभागृह (पुणे कॅम्प) येथे सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या या सत्कार सोहळ्याला राज्यभरातून शिक्षणक्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याच कार्य्रक्रमात कृष्णा मेडिकल अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ वेदप्रकाश मिश्रा यांचे ‘आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून भारतीय शिक्षणपद्धती ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे . तसेच ‘समृद्ध मातृभूमी ‘ या मासिकाच्या अंकाचे प्रकाशन होणार आहे .

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ .पी. ए. इनामदार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ शां. ब. मुजूमदार, डॉ विश्वनाथ कराड, डॉ सर्जेराव निमसे हे शिक्षणक्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत .शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात यशस्वी तरुणांचा सत्कारही या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

ग्लोबल हेल्थकेअर अँड एज्युकेशन फाउंडेशन, महा फेडरेशन ऑफ मायनॉरिटीज एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.