Jejuri : जेजुरी येथून पळवलेली दीड वर्षाची मुलगी सुखरूप ताब्यात ; आरोपी गजाआड

पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

एमपीसी न्यूज- सुमारे एक महिन्यापूर्वी जेजुरी येथून अपहरण केलेल्या दीड वर्षाच्या चिमुकलीला सुखरूप तिच्या आईकडे सुपूर्द करण्यात आली.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून आरोपीला गजाआड केले.

सागर पांडुरंग खरात (वय 27 रा.माळेगाव बुद्रुक, ता.बारामती जि.पुणे सध्या रा.कोलवडी मांजरी रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अटक करण्यात आली. या प्रकरणी सुरेखा उर्फ लिला विनोद भैसारे (वय ३५ वर्षे रा.खोमणे आळी, जेजुरी ता.पुरंदर जि.पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे २०१९ रोजी फिर्यादी सुरेखा भैसारे यांची दीड वर्षाची मुलगी जान्हवी हिला घेऊन गावातील पिंटू झगडे यांच्या अंत्यविधीसाठी गेल्या असताना जेजुरी पॉवर हाऊस येथून आरोपी खरात याने जान्हवीला तिच्या आईची नजर चुकवून पळवुन नेले.

पोलिसांच्या तपस पथकाने जेजुरी एसटी स्टँड व जेजुरी परिसरातील सीसी टीव्ही फुटेजची पडताळणी केली असता काळ्या रंगाच्या पल्सर गाडीवरील एक इसम संशयित असल्याचे आढळून आले. त्याप्रमाणे संशयित आरोपीचे फोटो बनवून त्याआधारे गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी काढली असता फूटेजमधील व्यक्तीचे नाव सागर पांडुरंग खरात असल्याचे निष्पन्न झाले. त्या माहितीवरून त्याचे गावी जाऊन माहिती काढली असता तो सुमारे एक महिन्यापासून गावी राहत नसल्याची माहिती मिळाली.

एका खबऱ्याकडून तो आज हडपसर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी सादर ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
संशयीत आरोपी निश्चित केला. त्याप्रमाणे संशयित आरोपीचे फोटो बनवून त्याआधारे गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी काढली असता फूटेजमधील व्यक्तीचे नाव सागर पांडुरंग खरात वय २७ रा.माळेगाव बुद्रुक, ता.बारामती जि.पुणे असे असल्याची माहिती समोर आली. त्यावरून त्याचे गावी जावून माहिती काढली असता तो सुमारे एक महिन्यापासून गावी राहत नसल्याची माहिती मिळाली. आज रोजी एका बातमीदाराकडून तो हडपसर परिसरात येणार असल्याची माहीती प्राप्त झालेने त्या ठिकाणी स्टाफने जावून सापळा रचून त्यास हडपसर येथून ताब्यात घेतले.

त्याच्याकडे मुलीबाबत चौकशी करता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु पोलीसी खाक्या दाखवताच त्याने जान्हवी हिला कोलवडी, मांजरी रोड येथे आपल्या पत्नीजवळ ठेवले असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्वरित कोलवडी येथून जान्हवीला ताब्यात घेऊन तिच्या आईकडे सुपूर्द केले.

ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, मोरेश्वर इनामदार, राजेंद्र पुणेकर, राजू मोमीन, प्रमोद नवले, महिला हवालदार पुनम कांबळे यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या कामगिरीबद्दल पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सदर पथकाचे कौतुक करून रोख बक्षीस जाहीर केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.