Lonikand : पुण्यात चोरट्यांचा मोठा डल्ला, गोडाऊन फोडून 105 आयफोन केले लंपास

एमपीसी न्यूज : पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या (Lonikand) वाघोली परिसरात असलेलं एक गोडाऊन फोडून चोरत्यांनी तब्बल 105 आयफोन चोरून नेले. तब्बल 65 लाख रुपयांचे आयफोन 14, आय फोन 14 प्रो चोरट्याने चोरून नेले.

वैभव झेंडे यांनी याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणीकंद पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, रात्री फिर्यादी यांनी नेहमीप्रमाणे गोडाऊन बंद केले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने गोडाऊनचा सिमेंटचा पत्रा फोडून आत प्रवेश केला आणि जबरी चोरी केली.

चोरट्याने 65 लाख रुपये किमतीचे अॅपल कंपनीचे आयफोन 13, आयफोन 14 आयफोन 14 प्रो या मॉडेलचे वेगवेगळ्या रंगाचे एकूण 105 मोबाईल सेट व 1 मोबाईल चार्जंग 5 अॅडपटर केबल सह लंपास केले

दुसऱ्या दिवशी फिर्यादी नेहमीप्रमाणे गोडाऊनमध्ये आले असता हा (Lonikand) संपूर्ण प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने या प्रकरणी तक्रार दिली. लोणीकंद पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Pimpri Chinchwad RTO : पिंपरी-चिंचवड ‘आरटीओ’चा दर्जा वाढला; आता झाले ‘प्रादेशिक परिवहन कार्यालय’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.