Pimpri : गुटखा विक्री केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा; सव्वा दहा लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज – गुटखा विक्री केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून गुटका, सुगंधित तंबाखू आणि टेम्पो असा एकूण 10 लाख 33 हजार 50 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

खेमचंद रामचंद कृपलानी (वय 50), दिनेश तुलसीमल तिरथाणी (दोघे रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी श्रीराम धुळे (वय 55) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यात गुटखा पान मसाला तसेच तत्सम पदार्थ विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असे पदार्थ विक्री करत असल्याबाबतची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी श्रीराम धुळे यांना मिळाली. संबंधित अधिकाऱ्यांनी पिंपरीमधील पवनेश्वर मंदिर चौकात छापा मारत गुटखा विक्री करणाऱ्या खेमचंद याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 10 लाख 33 हजार पन्नास रुपयांचा गुटखा आणि एक टेम्पो ताब्यात घेतला. खेमचंद याचा साथीदार दिनेश याच्याविरोधात देखील अन्नसुरक्षा मानदे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.