Talegaon Dabhade : 34 वी पुणे शहर व ग्रामीण किक बॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा उत्साहात

एमपीसी न्यूज- 34 वी पुणे शहर व ग्रामीण किक बॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा तळेगाव दाभाडे येथील माळवाडी गावातील माऊली मंगल कार्यालयामध्ये रविवारी ( दि 4) पार पडली.

स्पर्धेचे उद्घाटन मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष गणेश काकडे, वाको महाराष्ट्र व वाको पुणे किक बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष संतोष म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव भोंगाडे व मावळ केसरी पै. दीपक दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेत पुणे शहरातून व ग्रामीण मधून एकूण 227 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रथम सांघिक विजेतेपद विकटोरिया मार्शल आर्ट्स तर द्वितीय सांघिक विजेतेपद दाभाडे मार्शल आर्ट्स व तृतीय सांघिक विजेतेपद स्कुल ऑफ मार्शल आर्ट्स या संघांनी पटकावले.

स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ मावळ विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील भोंगाडे, रोटरी एमआयडीसीचे सचिव दशरथ जांभुळकर व प्रगतशील शेतकरी अंबर तात्या दाभाडे यांच्या हस्ते पार पडला. स्पर्धेचे आयोजन सुनीलनाना भोंगाडे स्पोर्ट्स फौंडेशन व दाभाडे मार्शल आर्ट्सचे सुभाष दाभाडे यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.