Nigdi : प्राधिकरण येथील हॉटेल रागामध्ये खास मांसाहारप्रेमींसाठी हटके स्ट्रीट फूड फेस्टिव्हल

एमपीसी न्यूज- श्रावण महिना संपून भाद्रपदातील उपवासाचे दिवस देखील आता संपले आहेत. त्यामुळे ख-या मांसाहारप्रेमींना आता सुगीचे दिवस आले आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे महिना दीड महिना मांसाहार न केल्याने गेलेली तोंडाची चव पुन्हा आणण्यासाठी आता प्राधिकरण येथील हॉटेल रागामध्ये खास फक्त मांसाहारी स्ट्रीट फू़ड फेस्टिव्हल सुरु झाला आहे. त्यामुळे ख-या अर्थाने मांसाहारप्रेमींचे सामिष खाण्याचे दुर्भिक्ष्य आता संपले आहे. खमंग, चमचमीत आणि मनसोक्त वेगवेगळ्या मांसाहारी डिश खायच्या आणि खिलवायच्या असतील तर हॉटेल रागाला भेट द्यायलाच हवी, असे हॉटेल रागाचे राहुल गावडे यांनी मुद्दाम सांगितले आहे. हा स्ट्रीट फूड फेस्टिव्हल फक्त पंधरा दिवसांसाठीच आहे. कारण नवरात्र सुरु झाले की परत उपवास सुरु होतात.

या स्ट्रीट फूड फेस्टिव्हलमध्ये एकापेक्षा एक हटके डिश आपल्याला मिळतील. नावापासूनच यात वैविध्य आहे. स्टार्टर्समध्ये खिमा लपटेला, चिकन भुनेला, तलेला झिंगा, रावडी मटन सुखा अशी खास स्ट्रीट फूडची आठवण यावी अशी नावे या डिशना दिली आहेत. याशिवाय केरला तवा रोस्ट चिकन चाखून पाहायलाच हवे असे आहे. तसेच यात बॉम्बे बोंबिल फ्रायदेखील आहे.

मेन कोर्समध्येदेखील खूप वैशिष्ट्यपूर्ण डिशेस आहेत. कोयला चिकन कढाई ही खास कराचीच्या मसाल्यानी सजलेली डिश येथे उपलब्ध आहे. त्याशिवाय चिकन भुक्कड घोटालामध्ये देखील एक वेगळाच ट्विस्ट आहे, जो इथे येऊनच खायला हवा. याशिवाय महाराजा चिकन करी, खिमा कलेजी, कोंबडी करी, मटण चाप मसाला येथे आहे. तसेच पोर्ट वाईनचा वापर केलेली नशीली मटण कढाई मस्ट ट्राय या सदरात मोडणारी……त्याशिवाय मच्छी फ्राय करीमध्ये फ्राय फिशच्या जोडीला करीदेखील आहे.

मेन कोर्सनंतरआपण वळतो ते राइसकडे. सो इथे तवा चिकन पुलाव, झटका मटण बिर्याणी आणि खास हैद्राबादी चिकन बिर्याणी आपली खादाडी तृप्त करण्यासाठी आहेत. या फेस्टिव्हलमध्ये फक्त आणि फक्त मांसाहारी डिशेसच आहेत. मग ज्यांना मांसाहारावर आडवा हात मारुन शाकाहारामुळे आपल्या जिभेला आलेला चिकटा दूर करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर हॉटेल रागाच्या स्ट्रीट फूड फेस्टिव्हलला भेट द्यायलाच हवी.
हॉटेलमध्ये आल्यानंतर वेटिंग करायला लागण्यापेक्षा यायच्या आधी फोनवरुन आपले टेबल बुक करण्यासाठी 88880 77799 / 020 2765 7799 या क्रमांकावर फोन करा.

हॉटेल रागा, स्विमिंग पूलजवळ, प्राधिकरण, आकुर्डी, फोन – 88880 77799, 020 2765 7799

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.