Pune : आध्यात्मिक गुरु शंतनू जोशी यांनी केले ‘साडेसाती’ या विषयावर मार्गदर्शन

एमपीसी न्यूज- साडेसाती म्हणजे काय ? ती कशासाठी असते ? त्यात नेमके काय शिकायचे असते ? त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन, शनी ग्रहाची वैशिष्ट्य या सर्व बाबींवर व्यवस्थापन तज्ञ आणि आध्यात्मिक गुरु शंतनू जोशी यांनी उद्बोधक माहिती दिली. निमित्त होते पुण्यात कमिन्स कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या साडेसाती’ या विषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमाची. ‘मदरली विस्डम’तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

शंतनू जोशी यांनी साडेसाती या विषयावर मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम दोन सत्रात घेण्यात आला. पहिल्या सत्रात त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विविध ग्रह, त्यांना सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास लागणारा वेळ याची माहिती दिली. शनीला सूर्यप्रदक्षिणेला लागणारा वेळ याची माहिती दिली. त्या वेळातून साडेसात वर्ष आणि साडेसातीचं गणित शंतनू जोशी यांनी समजावून सांगितले.

शनी ग्रहाची वैशिष्ट्य सांगत शंतनू जोशी यांनी साडेसाती कशासाठी असते ? त्यात नेमकं काय शिकायचं असत ? हे विविध उदाहरणातून समजावून सांगितलं. प्रेक्षकांना सहभागी करत काही प्रात्यक्षिकातून त्यांनी साडेसातीत येणाऱ्या अडचणी काय असतात आणि आपणच त्यातून कसा मार्ग काढायचा असतो हे सांगितले. दुसऱ्या सत्रात त्यांनी साडेसातीत काय शिकायचं असत, हे विविध उदाहरणातून समजावून सांगितले. प्रेक्षकांनी विचारलेल्या शंकांचे त्यांनी समाधान केले. ध्यानप्रक्रियेनंतर या सत्राची सांगता झाली.

साडेसातीबाबत जाणून घेण्यासाठी तसंच शंकानिरसन करून घेण्यासाठी विविध क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साडेसातीबाबतच्या अनेक शंकांच्या निरसनाबरोबरच साडेसातीची भीती मनातून घालवण्यासाठी हे सत्र निश्चितच यशस्वी आणि उपयुक्त ठरले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.