Talegaon Dabhade : संदीप सोमवंशी यांची भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज- भाजप युवा मोर्चा पुणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष व शिरूर लोकसभेचे संपर्कप्रमुख युवानेते संदीप सोमवंशी यांची पुणे जिल्ह्याच्या सरचिटणीसपदी गुरुवारी नियुक्ती करण्यात आली.

भारतीय जनता पार्टी पुणे (ग्रामीण) जिल्ह्याध्यक्ष गणेश भेगडे यांनी संदीप सोमवंशी यांची जिल्ह्याच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तळेगाव येथील प्रचार सभेमध्ये संदीप सोमवंशी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

या प्रसंगी मावळ तालुक्याचे आमदार व राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, मावळ प्रबोधिनीचे संस्थापक व भाजयुमोचे मावळ तालुक्याचे अध्यक्ष रवींद्र भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.