Pimpri : राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा

एमपीसी न्यूज – विनापरवाना पदयात्रा काढल्याप्रकरणी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे आणि माजी उपमहापौर जगन्नाथ साबळे यांच्यावर पिंपरी ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी पोलीस हवादलादर राजु शिवाजी पांढरे (वय 46) यांनी पिंपरी ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि. 17) लिंक रोड ते रमाबाईनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेसाठी पोलिसांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती.

महाराष्ट्र पोलीस अधिनियमन 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केला आहे. त्यामुळे बनसोडे आणि साबळे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.