Talegaon Dabhade : आदिवासी कातकरी बांधवांना दिवाळी फराळ व कपडे वाटप

एमपीसी न्यूज- खांडशी-उंबरवाडी येथील आदिवासी कातकरी बांधवांना सरपंच दत्तात्रय खेंगले व ग्रीन मिडोज सोसायटीच्या वतीने दिवाळी फराळ व कपडे वाटप करण्यात आले.

यावेळी खांडशीचे सरपंच दत्तात्रय खेंगले, सोसायटीचे अध्यक्ष श्रीहरी गायकवाड, उपाध्यक्ष रविकांत रणपिसे, संचालक कोंडीबा रोकडे, ज्ञानेश्वर गवारी, अरविंद ओसवाल, गौरव रोकडे आदी उपस्थित होते

यापुढे कुठलीही अडचण आल्यास सोसायटीच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन ग्रीन मिडोज सोसायटीचे अध्यक्ष श्रीहरी गायकवाड यांनी दिले तर सरपंच दत्तात्रय खेंगले यांनी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ज्या लोकांची नावे आहेत त्यांना स्मार्टकार्ड काढून देण्यात येईल व येत्या चार पाच दिवसांत आपण ते काम सर्वांना घेऊन पूर्ण करू असे सांगितले.

मागील सहा वर्षांपासून विविध कातकरी वाड्या वस्त्यांवर जाऊन दिवाळी निमित्त फराळ व कपडे वाटपाचा उपक्रम राबवला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.