BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon maval : बुधवारपासुन तुलसी रामायण कथा सोहळा

वडगाव मावळ – श्री पोटोबा, महादेव, मारूती, दत्त देवस्थान संस्थान वडगाव मावळ आयोजित श्री कालभैरवनाथ कार्तिकी जन्माष्टमी उत्सवानिमित्त श्री तुलसी रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळा बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर पर्यंत श्री तुलसी रामायण कथेचे आयोजन केले आहे. कथाकार ह भ प एकनाथ महाराज गाढे (बीड ) हे या सेवेचे निरूपण करणार आहेत.

मंगळवार दि. 19 रोजी रात्री 10 ते 12 ह भ प तुषार महाराज दळवी भाजे मावळ यांचे देवजन्माचे कीर्तन होणार आहे. बुधवार दि. 20 रोजी सकाळी 10 ते 12 ह भ प एकनाथ महाराज गाढे (बीड) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे व नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, सचिव अनंता कुडे, विश्वस्त गणेशआप्पा ढोरे, चंद्रशेखर भोसले, अॅड बबनराव म्हाळसकर, अॅड अशोक ढोरे, अरुण चव्हाण, दीपक बवरे, मंगेश खैरे,चंद्रकांत ढोरे, किरण भिलारे यांनी केले आहे. भाविकांनी जास्तीतजास्त संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3