Mumbai : आयडिया, व्होडाफोन, एअरटेलकडून 50 टक्के तर जिओकडून 40 टक्के दरवाढीची घोषणा

एमपीसी न्यूज- व्होडाफोन- आयडिया आणि ‘भारती एअरटेल’ या दूरसंचार कंपन्यांनी उद्या मंगळवार (दि. 3) पासून मोबाइल सेवेच्या प्रिपेड शुल्कात सुमारे 50 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे जाहीर केले आहे. तर रिलायन्स जियो’ कंपनीने देखील 6 डिसेंबरपासून सुमारे 40 टक्के दरवाढीची घोषणा केली आहे. त्यामुळे मोबाइलधारकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल कंपन्यांनी रिलायन्स जिओच्या स्पर्धेत तग धरण्यासाठी आतापर्यंत तुलनेने कमी दर ठेवून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता या कंपन्यांनी जाहीर केलेल्या प्रिपेड दरवाढीमुळे संभाषण आणि मोबाइल इंटरनेट वापराचे दर जवळपास दुप्पट होणार आहेत. तसेच मोबाइल कनेक्शन महिनाभर अतूट राहण्यासाठी दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना किमान ४९ रुपयांचा ‘रिचार्ज’ करणे आवश्यक असणार आहे.

प्रस्तावित दरवाढ पुढीलप्रमाणे-

एअरटेल

* प्रतिदिन 50 पैसे ते 2.85 रुपये दरवाढ

* डेटा आणि कॉलिंगचे भरघोस फायदे देण्याचा दावा

* निश्चित कॉलमर्यादा ओलांडल्यास प्रतिमिनीट 6 पैसे

व्होडाफोन-आयडिया

# अन्य कंपन्यांच्या मोबाइलवर केलेल्या कॉलसाठी प्रतिमिनीट 6 पैसे

#  दरवाढीमुळे 1,699 रुपयांचा अमर्याद वार्षिक प्लॅन 2,399  रुपयांवर

#  प्रतिदिन 1.5 बी डेटा वापराचा अमर्याद प्लॅन १९९ वरून २४९ रुपयांवर.

जिओ

# 6 डिसेंबरपासून सुमारे 40 टक्क्य़ांपर्यंत दरवाढ

# नव्या प्लॅन्समधून ग्राहकांना 300 टक्के अधिक लाभ देण्याचा दावा

# ‘ऑल इन वन प्लॅन्स’ मध्ये अमर्याद संभाषण आणि इंटरनेट वापराचा दावा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.