Pimpri : युवकांसाठी रविवारी ‘लेट्स टॉक’ कार्यक्रम

एमपीसी न्यूज- आयुष्यातील आव्हानांसाठी अध्यात्म कसे उपयोगी ठरू शकते या विषयावर ‘लेट्स टॉक- आयुष्यातील आव्हानांसाठी अध्यात्म’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र. आकुर्डी प्राधिकरण येथे रविवारी (दि. 9) हा कार्यक्रम होणार आहे.

वाढती स्पर्धा, मानसिक ताण आणि धकाधकीचे आयुष्य या सगळ्यावर आपण अध्यात्माच्या मदतीने कशी मात करु शकतो या विषयावर खुली चर्चा होणार आहे. गुरुप्रतिपदा या दिंडोरी प्रणित उत्सवाच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, आकुर्डी प्राधिकरण येथे रविवारी (दि. 9) संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत हा कार्यक्रम पार पडेल.

आजच्या तरुण पिढीसमोरील आव्हाने, मनस्वास्थ्य, या सर्वांवर अध्यात्मिक विचारने कशी मात करता येईल या विषयावर तरुणांशी खुली चर्चा केली जाणार आहे. तसेच आजच्या काळात यशस्वी होण्यासाठी आवश्यक संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, सामूहिक चर्चा, असे अनेक गुण अंगी बनवण्यासाठी विनामूल्य मार्गदर्शन केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.