Pune : मॅनेजमेंट कल्चरल फेस्टिव्हल एक्स्प्रेशन्स 2020 चा समारोप

एमपीसी न्यूज- भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रूनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) मध्ये एक्सप्रेशन्स 2020 या मॅनेजमेंट कल्चरल एक्स्प्रेशन्स 2020 या मॅनेजमेंट कल्चरल फेस्टिव्हलचा समारोप झाला. भारती विद्यापीठ एरंडवणे कॅम्पस येथे हा फेस्टिव्हल 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान पार पडला.

_MPC_DIR_MPU_II

भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रूनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) मध्ये एक्सप्रेशन्स 2020 या मॅनेजमेंट कल्चरल फेस्टिव्हलचे उदघाटन 7 फेब्रुवारी रोजी झाले. वरिष्ठ सह पोलीस आयुक्त मच्छींद्र चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी, सीए डॉ. मोहित अगरवाल यांच्या हस्ते फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. नृत्य स्पर्धेला इव्हेन्ट क्षेत्रातील मान्यवर रोशनी कपूर उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा फेस्टिव्हल 7 ते 9 फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आला.टेक्निकल प्रेझेंटेशन स्पर्धेपासून, कला, वक्तृत्व, नृत्य, फेस पेंटींग, पुस्तक समीक्षण असे अनेक उपक्रम या तीन दिवसात आयोजित करण्यात आले. या सर्व उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी स्वागत केले. फेस्टिव्हल संयोजक डॉ. प्रवीण माने, प्राध्यापक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.