Vadgoan Maval : मावळातील 57 ग्रामपंचायतीच्या 515 जागांसाठी 1596 नामनिर्देशन पत्र दाखल

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा बुधवार (दि.30) रोजी शेवटचा दिवस होता. आता पर्यंत 57 ग्रामपंचायतीच्या 190 प्रभागातील 515 जागांसाठी 1589 उमेदवारांनी 1596 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

आज गुरुवार (दि.31) रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे. अशी माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली.

15 जानेवारीला होणा-या तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दि 23 पासून सुरूवात झाली होती. काल बुधवार (दि 30) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. मंगळवार (दि 29 ) पर्यंत 966 अर्ज दाखल झाले होते. तर काल अखेरच्या दिवशी 630 अर्ज दाखल झाले. त्यामुळे एकूण दाखल झालेल्या अर्जांची संख्या 1596 झाली आहे.

दाखल झालेल्या अर्जांची छाननी आज गुरूवार (दि 31) रोजी होणार असून (दि 4) पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तर 15 जानेवारीला मतदान व 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

57 ग्रामपंचायती दाखल नामनिर्देशन पत्र संख्या पुढीलप्रमाणे : 

नवलाख उंब्रे 60, माळेगाव बुद्रुक 19,  इंगळुन 16, खांड 15,  डाहुली 24, कशाळ 23,  वडेश्वर 34,  कुसवली 12,  आढे 17,  परंदवडी 20, उर्से 46, सोमाटणे 40, धामणे 25, दारुंब्रे 32, गहूंजे 40,  सांगावडे 21, आंबी 38, माळवाडी 28, करंजगाव 24, गोवित्री 28,  साई 24, घोणशेत 21, चिखलसे 34, खडकाळा 71, कुसगाव खुर्द 19, टाकवे बुद्रुक 61, साते 65,  नाणे 24, कांब्रे नामा 17, वेहरगाव 42,  ताजे 28, मळवली 27,  पाटण 25, कार्ला 47, खांडशी 20,  उकसान 20,  शिरदे 22,  तिकोणा 23, कोथुर्णे 13,  वारू 34,मळवंडी ठुले 21,  आपटी 11, अजीवली 27, मोरवे 19, महागाव 46, आंबेगाव 10, कुसगाव बुद्रुक 55,  कुरवंडे 35, येलघोल 8, शिवली 21,  येळसे 26, बऊर 24, पाचाणे 14, कुसगाव पमा 7,  थुगाव 26, शिवणे 26,  आढले खुर्द 21.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.