Pune Crime : आयपीएलमधील बंगळूर-हैद्राबाद सामन्यावर सट्टा घेणारे 2 बुकी जेरबंद

एमपीसी न्यूज – दुबई येथे सुरु असणाऱ्या आयपीएल सामन्यावर सट्टा घेणाऱ्यांविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी शिरूर येथे कारवाई केली होती.

ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी सुरज अभय गुगळे, अदित्य दिलीप ठाकुर आणि प्रकाश जोशी या तिघांना अटक केली होती. 31 ऑक्टोबर रोजी बेंगलोर व हैद्राबाद यांच्यामध्ये खेळल्या जाणाऱ्या ड्रीम इलेव्हन ट्वेंटी-ट्वेंटी या सामन्यावर शिरूर येथील सी. टी. बोरा कॉलेज शेजारील मैदानात हा सट्टा सुरु होता. आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मोबाईल फोनचा बेटींग जुगार करीता गैरवापर केला.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्ह्याची व्याप्ती दोन जिल्ह्यात असल्याचे व त्यामध्ये आणखी काही आरोपीही सामिल असण्याच्या शक्यतेमुळे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. तसेच यातील मुख्य सूत्रधार शोधून काढण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्याचा तपास करताना त्यांना सट्टा घेणाऱ्या दोन बुकिंची नावे निष्पन्न झाली. प्रकाश देवीलाल जोशी (वय 48, रा. प्रेमदान चौक, सावेडी, अहमदनगर मूळ रा. देहराडून, उत्तराखंड) आणि त्याच्याकडून बेटींग घेणारा मुख्य सूत्रधार मोहन मथुरादत्त जोशी (वय 48, रा. प्रेमदान चौक, सावेडी अहमदनगर मूळ रा. नैनिताल, उत्तराखंड) या दोघांनाही पोलिसांनी अहमदनगर येथून ताब्यात घेतले आहे.

दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.