Chakan News : गुरांच्या बाजारात 2 कोटींची उलाढाल

चाकणला गुरांच्या बाजारात प्रचंड गर्दी

एमपीसी न्यूज : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मधील गुरांच्या बाजारात शनिवारी (दि. 13) मोठी उलाढाल झाली. चाकण येथील जनावरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल, म्हैस आणि शेळ्या मेंढ्या संखेंत मोठी वाढ झाली.

चाकण मार्केट मध्ये विक्रीसाठी आलेल्या 65 जर्शी गायींपैकी 37 गायींची विक्रीहोऊन 12 हजार ते 50 हजार रुपये भाव मिळाला. विक्रीसाठी आलेल्या 168 बैलांपैकी 97 बैलांची विक्री झाली  व 11 हजार ते 35, हजार रुपये भाव मिळाला. 245 म्हशींपैकी 115 म्हशींची विक्री झाली व 20 हजार  ते 65 हजार रुपये भाव मिळाला. चाकण मार्केट मध्ये शनिवारी तब्बल 8 हजार 260 शेळ्या मेंढ्या विक्रीसाठी आणण्यात होत्या. त्यांना 3 हजार ते 12 हजार रुपये भाव मिळाला.  चाकणच्या गुरांच्या बाजारात सुमारे 2 कोटी रुपयांची उलाढाल झाली.

दरम्यान बैलगाडा शर्यत बंदीने बैल बाजारामध्ये या बैलांच्या किमती कमी झाल्या आहेत. बैलांची आवक वाढत असली तरीही खरेदी विक्रीवरही परिणाम झाला आहे. सर्वोच्य न्यायालयात शर्यती सुरु करण्याबाबत निर्णय झाल्यास पुन्हा एकदा बैलांच्या किमती वाढतील, असे पठारवाडी ( चाकण ) येथील पशुपालक शेतकरी बाळासाहेब पठारे यांनी संगीतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.