शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

नवोदित मतदारांनीही बजावला मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज –  पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणा-या नवोदित मतदारांमध्येही मतदान केल्याचा उत्साह आजच्या मतदानातून पहायला मिळाला.  सकाळपासूनच शहरातील मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या रांगा पहायला मिळाल्या. यामध्ये युवकांचा सहभाग लक्षणीय होता. 

तरुणवर्गाकडून मतदानाच्या दिवशी असलेली सुट्टी म्हणजे मौजमजेत घालवली जाते असे म्हणत तरुणवर्गाला कायम दोष दिला जातात पण आज मात्र नागरिकांचा हा समज धुडकावून लावत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी मतदान केले आहे.

पहिल्यांदा मतदान केल्यामुळे खूप आनंद झाल्याच्या भावना अनेक विद्यार्थ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. तसेच मतदानाच्या दिवशी आवर्जून जाऊन मतदान करावे असा संदेशही यावेळी त्यांनी दिला. तसेच आपण केलेल्या पहिल्या मतदानाचा सेल्फी काढत ते अनेकांनी सोशल मीडियावर शेअर करण्याला अनेकांनी पसंती मिळाली.

"1

 

 

 

 

spot_img
Latest news
Related news