…..आणि कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील निवडणुकीच्या निकालाचे वातावरण तापू लागले असता  पिंपरी- चिंचवड येथे निकाल पाहण्यासाठी व एेकण्यासाठी नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. अनेक दिवसांची असणारी धाकधुग अखेर आज संपली त्याचे चित्र  पिंपरी-चिंचवड शहराततही पहायला मिळत होते.


सकाळपासून पक्षाच्या कार्यकत्यांनी  चिंचवड येथे गर्दी केले होती.  प्रत्येक जण कोणता पक्ष निवडून येईल याची चर्चा  सुरु होती. कोणी मोबाईलवरुन चौकशी करत होते तर कोणी फोनवरुन माहिती  विचारण्यात दंग होते. चौकाचौकात कोण येणार ही चर्चा सुरु होती. शहरातील प्रत्येक चौकाचौकात आपल्या उमेदवाराच्या लीडची चर्चा रंगली होती.   प्रत्येक कार्यकर्ते मोबाईलसवर अपटेड पाहण्यासाठी विचारत होते.

बालेवाडी येथे टिव्ही स्कीन न लावल्यामुळे कार्यकर्ते फोनवर अपडेटच विचारत असल्याचे चित्र पहायला मिळाले. आपला उमेदवार विजयी झाल्याचा आनंद कार्यकर्त्यांनी जल्लोषात साजरा केला.   विजयी उमेदवाराच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. त्यामुळे एकदाचा निकाल लागल्यानंतर कार्यकर्ते व उमेदवारांनी निकालातून सुटकेचा श्वास सोडला.  प्रत्येक जण मोबाईलवरील ग्रुपवरुन पिंपरी, चिंचवड, भोसरी यांची आकडेवारीची माहिती अपडेटस करत होता.

आपले उमेदवार विजयी झाल्याचे कळताच कार्यकर्त्यांनी मात्र गुलाल उधळून फटाके फोडून जल्लोष केला.

"jalosh

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.