पिंपरीकरांनी लूटला सिंध पदार्थांचा आस्वाद

एमपीसी न्यूज – एकाहून अधिक सरस पदार्थांचा आनंद पिंपरीतील सिट्रस हॉटेलमध्ये फूड फेस्टिव्हलच्या माध्यमांतून पिंपरीकरांनी लूटला. 14 ते 26 फेब्रुवारी पर्यंत हे फूड फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले होते. खवय्यांचे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख निर्माण झाली आहे. अशा खाद्यप्रेमींसाठी भरविण्यात आलेलेल फूड फेस्टिव्हल एक पर्वणीच ठरली.

सलग 13 दिवसांपासून सुरु असलेल्या फूड फेस्टिव्हलमध्ये राजस्थानचे शेफ पुष्पंदर यांनी वैविध्यपूर्ण डिशेसची मेजवानी लोकांना दिली, या फूड फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारच्या पदार्थांचा समावेश होता. घरातील इतर पदार्थांमध्ये दाल पकवानला प्रथम पसंती आहे. याच सिंधी संस्कृतीलच एक मानाचे पान म्हणजे दाल पकवान टिपिकल सिंधी डिश आहे. तेलात तळलेले मैद्याचे कुरकुरीत पकवान, थोडीशी तिखटस नमकीन डाळ आणि तोंडी लावायला आंबट गोड हिरवी चटणी. सिंधी रोटी, सुखा पटोटा, सिंधी बेसन करी आदी सिंध पदार्थाबरोबर पाश्चिमात्य पदार्थांचाही समावेश यात करण्यात आला होता. त्यास खवैय्यांनी पसंती दिली.

हे सगळे झाले की डेझर्ट, आइस्क्रीम, शीरकुर्मा, मिर्च का हलवा, सायभाजी, सिंधी पदार्थ, चॉकलेट कुल्फी, गुलाबजामून विथ कुल्फी, कुल्फी विथ गाजर हलवा, केशर पिस्ता कुल्फीही मिळेल. यानंतर मसाला पानाचा आस्वाद घेतला.

सर्व पदार्थांची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यातील असल्यामुळे लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. यासर्व खाद्य पदार्थांमध्ये ..यांना सर्वाधिक मागणी दिसून आली. सिंध पटोटा या सामोशाची चवच वेगळी. त्यात जिरं, शहाजिरं यांचं मिश्रण करून समोशाचा मसाला तयार केला जातो. त्यासाठीचा बटाटाही अगदी खास चवीचा. त्या दोघांच्या मिश्रणाने खास वनस्पती तुपात तळला गेलेला हा समोसा. त्यामुळे या सा-यांची एक न्यारी चव आपल्यासमोर येते. मैद्याचं कुरकुरीत आवरण व आत ही खास सिंधी चवीची बटाटयाची भाजी.

या फूड फेस्टिव्हलमध्ये सिंधी बेसन करी, सिंधी रोटी हे नाविन्य बघायला मिळाले. सिंधी बेसन करी
थोड्या पाण्यात चिंच भिजत घालावी. 1 लिटर पाणी उकळायला ठेवावे. त्यात चिंचेचा कोळ घालावा. भाज्यांचे तुकडे ह्या पाण्यात शिजवून घ्यावेत. 2 टेबलस्पून डाळीचे पीठ 1 ग्लास पाण्यात घालून सारखे करावे. एका पातेल्यात तेल तापत ठेवावे. नंतर त्यात मोहरी, जिरे व मेथी घालून फोडणी करावी. त्यावर उरलेले डाळीचे पीठ घालून लालसर होईपर्यंत परतावे. नंतर त्यात वरील भाज्यांचे गरम पाणी, हळद, वाटलेल्या मिरच्या, कढीलिंब, तिखट, मीठ, कोथिंबीर घालावी. उकळी आली की गार पाण्यात कालवलेले पीठ ओतावे. आमसुले व भाज्यांचे तुकडे घालावे. करी गरमच वाढावी.

सिंधी रोटीमध्ये कांदे, टोमॅटो, मिरच्या व कोथिंबीर बारीक चिरावी. पिठात मीठ, 2 मोठे चमचे तूप व चिरलेली भाजी घालून, थोडे पाणी वापरून मीठ घट्ट भिजवावे. अर्धा तास झाकून ठेवावे. याचे चार किंवा पाच गोळे करावे. जाडसर तळहाताएवढी रोटी लाटून तव्यावर तूप सोडून खरपूस भाजावी. डब्यात नेण्यास, प्रवासात किंवा न्याहारीस देण्यासाठी सोपा प्रकार आहे. बरोबर लोणचे व दही असावे.

सिंधी कोकीत  
एका भांड्यात कणीक घेऊन त्यात मीठ, अनारदाना पावडर, लाल तिखट, जीरे, हिरव्या मिरच्या, चिरलेली कोथींबीर, चिरलेली कांद्याची पात व तेल घालून सगळे एकत्र करा. लागेल तसे पाणी घालून कणीक भिजवून घ्या व 5-10 मिनिटे तिंबवून ठेवा. कणकेचे सारखे 7-8 गोळे करुन घ्या. सुक्या पिठात कणकेचा गोळा घोळवून हलक्या हाताने कोकी जाडसर लाटा. नॉन-स्टीक तवा तापवून कोकी एक मिनिटासाठी दोन्ही बाजूने हलकी भाजून घ्या. कोकी तव्यावरून उतरवून त्याचा पुन्हा गोळा करा.

गोळ्याला पुन्हा हलक्या हाताने लाटा व मंद आचेवर तव्यावर टाकून भाजा. वरुन थोडे तेल लावून एक बाजू चांगली खरपुस भाजा. उलटवून दुसरी बाजू ही तेल लावून भाजून घ्या. गरमा-गरम कोकी तुम्ही पुदिन्याची चटणी, टोमॅटो सॉस व पापडासोबत सर्व्ह करा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.