सांगवीत वडिलांनीच केला सावत्र मुलींवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – वडिलांनीच आपल्या दोन सावत्र मुलींवर वर्षभर लैंगिक अत्याचार केला. तसेच बहिणीच्या एका मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी (दि. 26) जुनी सांगवीत हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी 33 वर्षीय पित्यावर बलात्कार, विनयभंग आणि  बाल लैंगिक अत्याचार प्रतिंबध कायदा (पास्को) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत त्याच्या 32 वर्षीय पत्नीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपीचे पहिले लग्न  2003 मध्ये झाले होते. तर, फिर्यादी महिलेचे महिलेचेही पहिले लग्न झाले आहे. त्यांना दोन मुली आहेत. त्यांचे पतीसोबत जमत नसल्याने त्या विभक्त राहत होत्या. आरोपी पती हा त्यांचा नातेवाईक आहे. त्यामुळे फिर्यादी महिलेच्या कुटुंबाने  2010 मध्ये त्याच्यासोबत त्यांचे लग्न लावून दिले होते, असे पोलिसांनी सांगितले.

आरोपी हा गेल्या एक वर्षापासून त्याच्या 12 आणि 10 वर्षाच्या दोन सावत्र मुलींवर वर्षभर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. पाठीमागे हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आरोपीने माफी मागितली होती. त्यामुळे फिर्यादी महिलेने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली नव्हती.

त्यानंतरही आरोपी मुलींवर लैंगिक अत्याचार करत होता. त्याने फिर्यादी महिलेच्या बहिणीच्या 9 वर्षाच्या मुलीवरही लैंगिक अत्याचार केला आहे. अखेर फिर्यादी महिलेने पोलिसात धाव घेऊन त्याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर रविवारी (दि.26) रात्री त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.