विविध मागण्यांसाठी राज्यभरातील कर्णबधिरांचे पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज – आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील कर्णबधीर युवक पुणे शहरातील अपंग आयुक्त कार्यालयांसमोर एकवटला असून मागण्या मान्य होईपर्यंत त्यांनी  बेमुदत धरणे आंदोलनाला आजपासून सुरुवात केली आहे.

प्रौढ मुकबधिरांना सरकारी सेवेत रोजंदारी तत्वावर समाविष्ट करावे, अपंगाना रुपये 3400 रोजगार भत्ता प्रतिमाह वाढवून मिळालाच पाहिजे, मुकबधिरांसाठी सरकारी अथवा खासगी कार्यालयात मुलाखतीसाठी दुभाषकांची सोय करण्यात यावी. त्यांना वाहन चालविण्याचा परवाना देण्यात यावा. मूकबधिरांच्या आरक्षणातून शासकीय नोकरभरतीमध्ये सामावून घेण्यात आलेल्या मूक आणि कर्णबधिरांची तपासणी करावी. इतर कायद्याची ज्याप्रकारे अंमलबजावणी होते तशीच अंमलबजावणी अपंग व्यक्ती अधिनियम 1995 ची करण्यात यावी या आणि इतर मागण्यांसाठी राज्यभरातील कर्णबधीर तरुण रस्त्यावर उतरले आहेत.

या बेमुदत धरणे आंदोलनामध्ये पिंपरी- चिंचवड कर्णबधीर असोशिएशन, आधार मूकबधीर असोशिएसन वर्धा, नांदेड जिल्हा मूकबधीर सेवाभावी असोशिएसन, सिंधुदूर्ग जिल्हा मूकबधीर असोसिएशन यांच्यासह डोंबिवली, जळगाव, जालना, सांगली. चंद्रपूर, नंदुरबार, धुळे या शहरासह राज्यभरातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.