स्मार्ट सिटी प्रकल्प केवळ तोंडाला पावडर लावणारा प्रकल्प नसावा

पिंपरी-चिंचवडकरांची स्मार्ट सिटी प्रकल्पाकडून माफक आपेक्षा

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड अगदीच मागास शहर नसून त्यात आधी पासूनच काही सोयी-सुविधा आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीमध्ये या शहराला जे मुळात गरजेचे आहे त्या बाबींवर भर द्यावा. त्यामुळे हा प्रकल्प केवळ तोंडाला पावडर लावून स्वच्छ असल्याचे भासवणारा नाही तर मुळात अंघोळ घालूनच स्वच्छ करणारा असावा, असे उदाहरण देत शहराला काय हवे आहे हे मोजक्या शब्दांत नागरिकांनी प्रशासनासमोर मांडले.

नवी मुंबईने माघार घेल्यानंतर  पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला आहे. या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कार्यवाहीलाही सुरुवात झाली असून केंद्र सरकार व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज (शुक्रवारी) नागरिकांसाठी विषेश चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये स्मार्ट सिटीबद्दलच्या माझ्या कल्पाना या विषयावर नागरिकांनी आपल्या सुचना मांडल्या. या चर्चासत्रात शहरातील  संस्कार प्रतिष्ठान, पीसीसीएफ, ग्राहक पंचायत, ज्येष्ठ नागरी महासंघ, पोलीस व नागरिक मित्र, महात्मा फुले मंडळ अशा आदी संस्थांच्या  सदस्य व इतर नागरिकांनी सहभाग घेतला होता.

यावेळी नागरिकांना स्मार्ट सिटी प्रकल्प काय आहे, त्यामध्ये कोणकोणत्या योजना राबबविल्या जातील, तसेच शहाराचा केलेला अभ्यास याबाबत माहिती देण्यात आली. त्याबरोबरच उपस्थितीत नागरिकांना  शहरासंबंधीत प्रश्नांची एक प्रश्नावली दिली गेली ज्यामध्ये त्यांनी शहरात कोणता विकास अपेक्षीत आहे, कोणत्या गोष्टींवर भर दिला पाहिजे तसेच  शहरात कोणता भाग विकासापासून वंचित आहे यावर आपली मते नोंदवली.


# विकासापेक्षा नागरिकांच्या आनंद व समाधानावर भर द्या-

यावेळी नागरिकांना या विषयावर बोलण्याची संधी दिली यावेळी नागरिकांनी स्मार्ट सिटीमध्ये खूप मोठे-मोठे प्रकल्प देऊ केले आहेत. मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये चांगले रस्ते आहेत, मेट्रो ट्रेन येत आहे, बीआरटीएस आहे, उत्तम उद्याने आहेत त्यामुळे नवीन कोणते बांधकाम करण्यापेक्षा जे आहे त्यात सुधारणा करणे तसेच त्यांची योग्य देखभाल करण्यावर भऱ द्यावा, कचरा, ड्रेनेज सिस्टीम सुधारावी, अतिक्रमणे हटवावीत अनधिकृत बांधकामांना आळा बसवावा, फलकाद्वारे होणारे विद्रुपीकरण थांबवावे, पादचा-यांसाठी विशेष धोरण अवलंबीले जावे,  प्रदूषणावर नियंत्रणासाठी योजना आखावी, नदी सुधार योजना राबवावी,  शुन्य कचरा प्रकल्प राबवावा थोडक्यात नवीन काही करण्या आधी जे आहे त्याला अधिक स्मार्ट बनवावे अशी अपेक्षा नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड शहराने गेल्या 10 वर्षात विकास साधला आहे. त्यामुळे शहरात विकास नाही असे म्हणायला वाव नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीतून  मोठा काही तरी बदल घडविण्या पेक्षा आहे त्याला चांगले व सुटसुटीत बनवा. शहराला भूतानप्रमाणे विकासाची गुणवत्ता देण्यापेक्षा आनंद व समाधानाची गुणवत्ता द्या.  नागरिकांना आपण भरत असलेल्या करातून समाधानकाराक सुविधा मिळतील एवढीच अपेक्षा आहे, असे म्हणत स्मार्ट सिटीमध्ये जे मोठे प्रकल्प सरकार देऊ करत आहे. त्याबरोबर ते केवळ दिखाऊ नसावेत तर त्यांचा खरेच नागरिकांना व शहराला लाभ झाला पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.