मोशीत लोखंडी चेन अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कंपनीत काम करत असताना लोखंडी चेन अंगावर पडल्याने कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास मोशी येथील ओनकार कंपनीत घडली.

श्रीकिसन रघूनाथ राम (वय 35, रा. चिखली), असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकिसन राम हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. सध्या तो चिखलीत राहत होता. मोशी येथील ओनकार कंपनीत तो काम करत होता. शुक्रवारी सकाळी कंपनीत काम करत असताना लोखंडी चेन त्याच्या अंगावर पडली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरीतील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.