शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

नगरसेवक नाही जनसेवक म्हणून काम करणार; प्रवीण भालेकर

एमपीसी न्यूज – रुपीनगर, तळवडे, त्रिवेणीनगर प्रभागातील संपूर्ण जनतेने साथ दिली. विश्वास दाखविला.  प्रभागातील नागरिकांचा हा विजय आहे. मी नागरिकांचा नोकर आहे. निवडून आलो म्हणून हवेत जाणार नाही. नगरसेवक म्हणून नाही तर जनसेवक म्हणून काम करणार असल्याचे, नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले. 

प्रभाग क्रमांक 12 रुपीनगर, त्रिवेणीनगर, म्हेत्रेवस्तीमधून प्रवीण भालेकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आहेत. त्यांचा वाहतुकीचा व्यवसाय आहे. 

प्रवीण भालेकर यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. शेती आणि व्यवसाय करत समाजकार्य करण्यास सुरुवात केली. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविले. तरुणांचे संघटन केले. विविध प्रश्नांसाठी आंदोलने छेडली. महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आणि प्रवीण भालेकर यांनी विद्यमान नगरसेवक असलेल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा दारुण पराभव करत विजय खेचून आणला आहे. 

तरुणांचे संघटन बांधले. समाजकार्य करण्यास सुरुवात केली. वाहतुकीचा व्यवयाय असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अडी-अडचणी जवळून पाहल्या आहेत. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, या उद्देशाने समाजकार्याला सुरुवात केली. गोरगरिब नागरिकांना मदत केली. प्रभागातील प्रश्नांसाठी वेळोवेळी आंदोलने छेडली. 

राष्ट्रवादीचे काम करत असताना पक्षाने विश्वास दाखवत दोन वर्षापूर्वी ‘फ’ प्रभागावर स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली. त्याच्या माध्यमातून अंतर्गत रस्ते, पाणी असे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. पक्षाने काम पाहून महापालिका निवडणुकीसाठी आपणावर विश्वास दाखवून उमेदवारी दिली. 

प्रभागातील नागरिकांना विकासच माहित नव्हता. त्यामुळे प्रभागातील नागरिकांना बदल हवा होता. संपूर्ण शहरात भाजपची लाट असताना आणि प्रतिस्पर्धी उमेदवार विद्यमान नगरसेवक असताना प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांनी निवडणूक हाती घेऊन राष्ट्रवादीचे संपूर्ण पॅनेल निवडून दिले आहे. आपल्याकडून प्रभागातील जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणार असून भ्रमनिरास होऊ देणार नसल्याचे, प्रवीण भालेकर यांनी सांगितले. 

प्रभागातील बहुंताश भाग रेडझोनच्या हद्दीत येत आहे. त्याच्यावर मात करुन प्रभागात विकासाची गंगा आणणार आहे. रुपीनगर भागात भाजी मंडई, प्रभागाच्या सौंदर्यात भर पडेल असे डीअर सफारी पार्क, विरंगुळा केंद्र, उद्यान करणार आहे. त्याचबरोबर वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पर्यायी रस्ता करणार आहे.
spot_img
Latest news
Related news