शेतकरी कुटुंबातून आलेले नगरसेवक नामदेव ढाके

एमपीसी न्यूज – येत्या पाच वर्षात प्रभागाचा विकास करणार असून प्रलंबित प्रश्न सोडविणार असल्याची भावना नगरसेवक नामदेव ढाके यांनी बोलून दाखविली, प्रभाग क्रमांक 17 मधून नामदेव ढाके हे भाजपमधून निवडून आले. घरात कोणतेही  राजकीय पार्श्वभूमी नाही. वडील शेतकरी. आई गृहिणी.

ग्रामीण  भागात माझा जन्म झाला असून माझे शिक्षण आयटीआयमधून झाले. 1991 मध्ये टाटा मोटर्ससमध्ये रुजू  झालो. 1996 पासून विविध राजकीय, सामाजिक उपक्रमास  सुरुवात केली. नागरी समस्या आदींच्या माध्यमांतून समाजकार्याची आवड  लागली. समाजकारण करता करता राजकीय कामाची आवड निर्माण झाली. तशी महापालिकेत कोणत्या ना कोणत्या कामासाठी येत गेलो. पण हक्काचे पद असलेले नगरसेवक पद मिळाल्यानंतर पहिलेच पाऊल महापालिकेत टाकणार याचा विशेष आनंद होतोय. कष्ट खूप केले. या कष्टाचे फळ ही माझ्या मतदारांनी मला दिले. त्यांचा मी कायम ऋणी राहील.

प्रभागात असणा-या विविध समस्या सोडविण्याकडे विशेष लक्ष देणार. त्यात प्रभागात ग्रंथालयाची सोय नाही. मैदान नाही. प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याकडे कल राहणार आहे.  यापूर्वी ही निवडणूक लढविली होती ती 2007 मध्ये काही मतांनी पराभव झाला होता. पण त्याची पर्वा न करता मी पुन्हा सामाजिक कार्यात  हिरीरीने भाग घेत राहिलो, आता तेच कार्य पुढेही निभावणार असल्याचे त्यांनी  सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.