एमएसएलटीए आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) तर्फे आयोजित एमएसएलटीए आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या पीवायसी हिंदू जिमखाना संघाने मुंबईच्या सीसीआय संघाचा 24-07 असा सहज पराभव करून विजेतेपद संपादन केले.

मुंबई येथील एमएसएलटीए टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत पीवायसी हिंदू जिमखाना संघाने सीसीआय संघाचा 24-07 असा पराभव केला.  सामन्यात 100अधिक गटात पीवायसीच्या जयंत कढे व हेमंत बेंद्रे यांनी सीसीआयच्या राजेश बात्रा व राजीव वालिया 6-2 असा तर, 90अधिक गटात पीवायसीच्या हिमांशु गोसावी व केदार शहा यांनी सीसीआयच्या चेतन देसाई व इंतीकाब अली यांचा 6-4असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. खुल्या गटात पीवायसीच्या अनुप मिंडाने अभिषेक ताम्हाणेच्या साथीत सीसीआयच्या अंब्रीश अरोरा व गगन मंगत यांचा 6-0असा तर, केतन धुमाळ व परज नाटेकर यांनी विजय छाब्रीया व विक्रम संपत यांचा 6-1असा एकतर्फी पराभव करत संघाला विजय मिळवून दिला.

याआधीच्या साखळी फेरीच्या लढतीत सीसीआय संघाने कंबाईन डिस्ट्रिक्ट संघाचा 21-16 असा तर, पीवायसी हिंदू जिमखाना संघाने कंबाईन डिस्ट्रिक्ट संघाचा 24-12 असा पराभव केला.

स्पर्धेतील विजेत्या पीवायसी हिंदू जिमखाना संघाला 75हजार रूपये व करंडक, तर उपविजेत्या सीसीआय संघाला 50हजार रूपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, शरद कन्नमवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे सीईओ मनोज वैद्य यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

*स्पर्धेचा सविस्तर निकालः अंतिम फेरीःपीवायसी हिंदू जिमखाना वि.वि.सीसीआय 24-07(100अधिक गटः जयंत कढे/हेमंत बेंद्रे वि.वि.राजेश बात्रा/राजीव वालिया 6-2; 90अधिक गटः हिमांशु गोसावी/केदार शहा वि.वि.चेतन देसाई/इंतीकाब अली 6-4; खुला गटः अनुप मिंडा/अभिषेक ताम्हाणे वि.वि.अंब्रीश अरोरा/गगन मंगत 6-0; केतन धुमाळ/परज नाटेकर वि.वि.विजय छाब्रीया/विक्रम संपत 6-1);

साखळी फेरीः सीसीआय वि.वि.कंबाईन डिस्ट्रिक्ट 21-16(100अधिक गटः राजीव वालिया/विक्रम संपत वि.वि.शितल भोसले/डॉ.दिनेश शिंगटे 6-2; 90अधिक गटः चेतन देसाई/राजेश बात्रा पराभुत वि.विजय मेहर/अक्रम खान 5-6(7-5); खुला गटः अंब्रीश अरोरा/आदित्य शहा पराभुत वि.दत्ता जगदाळे/इम्रान शेख 4-6; इंतीकाब अली/विजय छाब्रीया वि.वि.आदित्य राव/यती गुजराती 6-2);

पीवायसी हिंदू जिमखाना वि.वि.कंबाईन डिस्ट्रिक्ट 24-12(100अधिक गटः जयंत कढे/डॉ.अभय जमेनिस वि.वि.शितल भोसले/डॉ.दिनेश शिंगटे 6-4; 90अधिक गटः हिमांशु गोसावी/अनुप मिंडा वि.वि.अक्रम खान/विजय मेहर 6-3; खुला गटः केतन धुमाळ/परज नाटेकर वि.वि.दत्ता जगदाळे/इम्रान शेख 6-3; अभिषेक ताम्हाणे/केदार शहा वि.वि.यती गुजराती/आदित्य राव 6-2).

"dipex"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.