शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

एमबीए स्टुडंट प्रज्ञा खानोलकर आता महापालिका सभागृहात

एमपीसी न्यूज  –  वय अवघे 21 वर्षे….एमबीए फस्ट टर्म पूर्ण असलेली प्रज्ञा आता महापालिकेत नगरसेविका म्हणून कार्यभार सांभाळणार आहे.  प्रभाग क्रमांक 16 रावेत-किवळे राष्ट्रवादीच्या चिन्हावर 7 हजार 490 मतांनी  विजय मिळविला आहे.

यानिमित्ताने एमपीसी न्यूजने प्रज्ञाशी साधलेल्या संवादात, राजकारण  हे तसे मी पहिल्यापासून घरात पाहत आले आहे. माझे काका मनोज खानोलकर हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक.  त्यांच्यामुळे मला राजकारण काय असतं हे समजू शकले. काकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे व श्री स्वामीं समर्थाची कृपा, मतदारांनी दिलेली मत यामुळे मी विजय संपादन करु शकले.  एकीकडे शिक्षण तर दुसरीकडे प्रभागाचा विकास या दोन महत्वाच्या गोष्टी पूर्ण करणार असल्याचे  प्रज्ञा सांगते.

प्रज्ञाचे वडील महेश व आई मनिषा यांचे तिला सहकार्य व मार्गदर्शन वेळोवेळी मिळत गेले. त्यांच्या पुण्याईने मी इथपर्यंत पोहचले असे ती सांगते. थोडीशी नटखट असलेली प्रज्ञा ही अभ्यासातही तेवढीच हुशार आहे. तिचा भाऊ रुणाल खानोलकर याची मदत तिला मिळाली.  नगरसेविका म्हणून आता कॉलेजमध्ये जाणार याचा अभिमान असल्याचे ती सांगते. शिक्षणाकडे दूर्लक्ष होणार नसल्याचेही ती सांगते.   
     

प्रभागाच्या विकासाबात ती म्हणते,  विविध योजनांचा लाभ या प्रभागातील नागरिकांना करुन देणार आहे.  प्रभागाचे सुशोभीकरण करुन त्यात  मुलांसाठी गार्डनची सोय करणार आहे. तरुणपिढीला एकत्र आणणार. महिलांसाठी असणारे विविध उपक्रम, कार्यक्रम सातत्याने राबविण्यावर भर देणार असल्याची ती सांगते.    

spot_img
Latest news
Related news