ज्येष्ठ धृपद गायक सईदुद्दीन डागर यांचे पुण्यात निधन

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ धृपद गायक सईदुद्दीन डागर ( वय 78) यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी रात्री पुण्यात निधन झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे. जयपूर येथील बाबा बहराम खां डागर या निवासस्थानाजवळ दर्गा परिसरात त्यांचा दफनविधी होणार आहे. डागर घराण्यातील 19 व्या पिढीतील ते गायक होते. मूळचे  राजस्थान मधील असलेले सईदुद्दीन डागर हे बंगालमध्ये स्थायिक झाले होते. 1984 पासून ते पुण्यात स्थायिक झाले होते.  त्यांची दोन मुले नफीसुद्दीन आणि अनिसुद्दीन डागर यांनी त्यांची धृपद गायकीची परंपरा पुढे चालू ठेवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.