पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 2017-18 चा अर्थ संकल्प तयार ; स्थायी समितीच्या गठणाची प्रतिक्षा

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्पाचे काम पुर्ण झाले असून तो येत्या दोन दिवसात छापाईसाठीही देण्यात येणार आहे. त्यासाठी केवळ आता स्थायी समिती गठित करण्याची प्रशासन प्रतिक्षेत आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मुख्यलेखापाल राजेश लांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महापालिकेने मार्च अखेर आपले आगामी वर्षाचे अंदाजपत्रक देणे अफेक्षीत असते. त्यानुसार प्रशासनाचे 2017-18 या आगामी वर्षाचे अंदाजपत्रक तयार झालेले आहे. त्यानुसार ते येत्या दोन दिवसात छापाईसाठीही जाणार आहे. मात्र निवडणूकांमुळे अद्याप स्थायी समिती गठीत झालेली नाही. येत्या 23 मार्ज रोजी आयेतद केलेल्या महापालिका सभेत समितीचे गठण होण्याची शक्यता आहे.

मात्र तरीही समिती गठीत झाली नाही तर महापालिका नियमांनुसार आयुक्तांच्या अंदाजपत्रकानुसार 1 एप्रिलपासून  कामकाजाला सुरुवात केली जाईल, असेही लांडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.