३० सप्टेंबर : दिनविशेष

What Happened on September 30, What happened on this day in history, September 30. See what historical events occurred, which famous people were born and who died on September 30.

३० सप्टेंबर : दिनविशेष – आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन

३० सप्टेंबर – महत्वाच्या घटना

  • १३९९: हेन्‍री (चौथा) इंग्लंडचा राजा बनला.

    १८६०: ब्रिटनची पहिली ट्राम सेवा सुरु झाली.

    १८८२: थॉमस एडिसन यांचे पहिले व्यावसायिक हायड्रोएलेक्ट्रिक पॉवर प्लांट अमेरिकेतील विसकॉन्सिन, ऍप्लेटॉन येथील फॉक्स नदीवर सुरु झाले.

    १८९५: फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले.

    १९३५: हुव्हर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.

    १९४७: पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

    १९५४: यू.एस. एस. नॉटिलस या अणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.

    १९६१: दुलीप करंडकचा पहिला सामना मद्रास (चेन्नई) येथे खेळला गेला.

    १९६६: बोत्सवानाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.

    १९९३: किल्लारी भूकंपात सुमारे १०,००० लोक ठार, हजारो लोक बेघर.

    १९९४: गीतकार मजरुह सुलतानपुरी यांनादादासाहेब फाळके पुरस्कार.

    १९९८: डॉ. के. एन. गणेश यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर.

    २०००: ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाउंंडेशनतर्फे हॉल ऑफ फेम हा विशेष पुरस्कार जाहीर.

३० सप्टेंबर– जन्म

  • १२०७: फारसी मिस्टीक आणि कवी रूमी यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १२७३)

    १८३२: मातृदिन (मदर्स डे) च्या सहसंस्थापिका ऍन जार्विस यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९०५)

    १९००: न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री एम. सी. छागला यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८१)

    १९२२: चित्रपट दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट २००६)

    १९३४: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री ऍन्ना काश्फी जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट २०१५)

    १९३९: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ ज्याँ-मरी लेह्न यांचा जन्म.

    १९४१: ५वे राष्ट्रकुल सचिव सरचिटणीस कमलेश शर्मा यांचा जन्म.

    १९४३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ जोहान डायझेनहॉफर यांचा जन्म.

    १९४५: इस्रायलचे १२वे पंतप्रधान एहूद ओल्मर्ट यांचा जन्म.

    १९५५: सन मायक्रोसिस्टिम्स चे सहसंस्थापक अँनी बेचोलॉल्म्स यांचा जन्म.

    १९६१: क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित यांचा जन्म.

    १९३३: संगीतकार व व्हायोलिनवादक प्रभाकर पंडित यांचा जन्म. (मृत्यू: २८ डिसेंबर २००६)

    १९७२: पार्श्वगायक शंतनू मुखर्जी ऊर्फ शान यांचा जन्म.

    १९८०: स्विस लॉनटेनिस खेळाडू मार्टिना हिंगीस यांचा जन्म.

    १९९७: डच फॉर्मुला १ ड्रायव्हर मॅक्स वर्स्टॅपन यांचा जन्म.

३० सप्टेंबर– मृत्यू

  • १२४६: रशियाचे झार यारोस्लाव्ह (दुसरा) यांचे निधन.

    १६९४: इटालियन डॉक्टर मार्सेलिओ माल्पिघी यांचे निधन. (जन्म: १० मार्च १६२८)

    १९८५: अमेरिकन भूवैज्ञानिक चार्ल्स रिच्टर यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९००)

    १९९२: लेखक व चरित्रकार गंगाधर खानोलकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९०३)

    १९९८: भूदान चळवळीतील कार्यकर्त्या चंद्राताई किर्लोस्कर यांचे निधन.

    २००१: केंद्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री माधवराव शिंदे यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९४५ – मुंबई)

    २०१४: भारतीय पाद्री आणि राजकारणी मोलिवि इफ्तिकार हुसैन अन्सारी यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९४३)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.