Pune : शेतजमिनी, फळबागांचे 6 नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करा -चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतजमिनी, फळबागांचे पंचनामे 6 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील अतिवृष्टीनेग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत आदी उपस्थित होते. अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना दिलासा देणे शासनाची जबाबदारी असून त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.