India Corona Update: चोवीस तासांत 34,133 कोरोना रुग्णांची नोंद, 91,930 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत देशभरात 34 हजार 133 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, तर 91 हजार 930 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट घटून 3.19 टक्के एवढा झाला आहे. 

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 4 कोटी 26 लाख 65 हजार 534 एवढी झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 16 लाख 77 हजार 641 रूग्ण यशस्वी उपचारानंतर बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.68 टक्के एवढा झाला आहे.

 

देशातील ॲक्टिव्ह रूग्णसंख्या घटली असून, सध्या देशात 4 लाख 78 हजार 882 ॲक्टिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 346 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशात आजवर 5 लाख 09 हजार 011 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.19 टक्के एवढा झाला आहे.

ICMR च्या आकडेवारी नुसार आजवर 75.18 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 10.67 नमूने तपासण्यात आले आहेत. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 172.95 कोटी जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.