बारावीच्या परिक्षेसाठी मावळ तालुक्यातून 3853 विद्यार्थी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आजपासून सुरू झालेल्या बारावीच्या परिक्षेसाठी मावळ तालुक्यातून 3853 विद्यार्थी बसले आहेत. लोणावळा शहरातील व्ही.पी.एस हायस्कूल व तळेगाव दाभाडे शहरातील इंद्रायणी कॉलेज ही दोन बारावीची मुख्य केंद्र असून लोणावळा महाविद्यालय, डॉन बॉस्को व इतर काही शाळा उपकेंद्र आहेत.

तळेगावातील इंद्रायणी कॉलेज या केंद्राच्या अंतर्गत 2487 विद्यार्थी व लोणावळ्यातील व्ही.पी.एस. हायस्कूल या केंद्राच्या अंतर्गत 1366 विद्यार्थी बारावीची परीक्षा देत असल्याची माहिती मावळ तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी एस.जे.तांबे यांनी दिली.

ते मावळ तालुक्याचे मुख्य परीक्षक असून एस. ए.डोंबे हे उपपरीक्षक तर सह परीक्षक म्हणून एस.जी. नेवाळे, संतोष कांबळे, रुपेश महाडिक, एम.एम. भालशंकर, एस.सी.पाटील व एच.जी.शिवदे हे काम पाहत आहेत. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडाव्यात याकरिता परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त व परीक्षक नेमण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.