Lions FA : 4 लायन्स एफए, स्निग्मय ‘ब’ संघांने मिळवला सहज विजय

एमपीसी न्यूज : 4 लायन्स एफए (Lions FA) आणि स्निग्मय एफसी ब संघांनी एकतर्फी विजयासह पीडीएफए फुटबॉल लीग स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली.

सप महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात 4 लायन्स एफए संघाने भारती एफसी संघाचा 5-0  असा पराभव केला. एच गटातील या सामन्यात कुणाल येवले याने 4 आणि 34व्या मिनिटाला गोल करून विजयात मोठा वाटा उचलला. मार्शिलीन याने 29 आणि 49व्या मिनिटाला दोन, तर तन्मय पंथोड याने 54व्या मिनिटाला एक गोल केला.

 

Khashaba Jadhav Sports : खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

त्यानंतर झालेल्या ई गटातील (Lions FA) सामन्यात स्निग्मय एफसी ब संगाने जुन्नर तालुका संघावर 3-0 अशी एकतर्फी मात केली. मनु अल्फास याने सातव्या, तर विष्णू पिल्लेने 18व्या,  सुदीप सुरेंद्र याने 49व्या मिनिटाला गोल केले.

एसएसपीएमएस मैदानावर झालेल्या महिला लीगमधील सामन्यात उत्कर्ष क्रीडा मंच ब संघाने केशव क्रीडा प्रतिष्ठान संघाचा 5-0 असा पराभव केला. शरण्या नंदी हिने 14 आणि 20व्या मिनिटाला दोन गोल केले. तेजस्विनी थापा हिनेही 16 आणि 25व्या मिनिटाला दोन गोल करून आपला वाटा उचलला. सारिशा अगरवाल हिने 36व्या मिनिटाला एक गोल केला.

निकाल –
एसएसपीएमस मैदान – महिला लीग
गट अ – उत्कर्ष क्रीडा मंच ब 5 (शरण्या नंदी 14, 20वे, तेजस्विनी थापा 16, 25वे सारिशा अगरवाल 36वे मिनिट) वि. वि. केशव माधव प्रति 0
गट ब – उत्कर्ष क्रीडा मंच अ 2 (कल्याणी धुमाळ 27वे, रचेल मायकेल 56वे मिनिट) वि.वि. बेटा स्पोर्टस क्लब 0
गट ब – बेकडिन्हो 3 (ऐश्वर्या जगताप 42 वे, ईशा पाचपुते 48, 60 वे मिनिट) वि.वि. युपीएसए 1 (धनश्री लांडगे 15 वे मिनिट)

सप महाविद्यालय – तृतिय श्रेणी
गट इ – नॉईजी बॉईज (योगेश लाड 45वे, दिनेश राठोड 57 वे मिनिट) वि.वि. नाझ एफए 0
गट ई – स्निग्मय एफसी ब 3 (मनु अल्फास 7 वे, विष्णू पिल्ले 18 वे,. सुदीप सुरेंद्र 49 वे मिनिट) वि.वि. जुन्नर तालुका 0
गट एच – 4 लायन्स एफए 5 (कुणाल येवले 4थे, 34वने, सी. मार्शिलीन 29, 49वे मिनिट, तन्मय पंथोड 54वे मिनिट) वि.वि. भारती एफसी 0
गट डी – इंद्रायणी एससी ब 0 बरोबरी वि. इन्फॅंट्स 0
गट डी – पिंपरी चिंचवड 1 (रेवन आसवले 34वे मिनिट) बरोबरी वि. पूना सोशल स्पोर्टस क्लब 1 (मनिष घाग 36वे मिनिट)
गट सी – इनव्हे़र्स एससी 3 (आनंद कुमार 28वे, पृथ्वी ए 43, गोपाळ कुसाळकर 54वे मिनिट) वि.वि. केएमपी इलेव्हन 1 (सकलैन शेख 22वे मिनिट)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.