स्मार्ट सिटीच्या प्रभागात सर्वात कमी 40 टक्के तर पुण्यात 55.53 टक्के मतदान

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेची निवडणूक शांततामय पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाने आणि पोलीस विभागाने विशेष प्रयत्न केले. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काही भागात हाणामारीच्या घटना आणि मतदार यादीतील घोळ होण्याचे प्रकार घडले. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पाहण्यास मिळाली. तरी पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 55.53 टक्के इतके मतदान झाले आहे. या विषयी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी माहिती दिली. यामध्ये केंद्र सरकारने स्मार्ट सिटीसाठी घोषित केलेल्या परिसरात केवळ 40 टक्के इतके मतदान झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीतील स्मार्ट मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले आहे.    

या निवडणुकीबाबत महापालिका आयुक्त कुणाल कुमार म्हणाले की,  पुणे महानगरपालिकेच्या 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शहारत 26 लाख 34 हजार 798 मतदार असून त्यापैकी 14 लाख 10 हजार 974 मतदारांनी मतदान केले आहे. या आकडेवारीवरून 53 टक्के 55 टक्के मतदान करण्यात आले आहे. तसेच बाणेर, बालेवाडी आणि पाषाण या प्रभाग क्रमांक 9 मध्ये 40 टक्के मतदान झाल्याचे आकडेवारीवरून माहिती समोर आली आहे. यातून स्मार्ट सिटीच्या भागातील मतदारांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट होत आहे. प्रभाग क्रमांक 15 मधील शनिवार पेठ, सदाशिव पेठ यामध्ये सर्वाधिक 62.51 टक्के इतके मतदान करण्यात आले आहे.

त्याचबरोबर यंदाच्या महापालिका निवडणुकी दरम्यान काही ठिकाणी मतदार स्लिपा वेळेत मतदारापर्यंत पोहोचल्या नाहीत. यामुळे नागरिकांना त्रासाला देखील सामोरे जावे लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दुपारी चार नंतर काही प्रभाग केंद्रावर गर्दी देखील वाढली. त्यामध्ये हडपसर आणि बोपोडीचा भाग असून त्या मतदार केंद्रावर रात्री 9 वाजेपर्यंत मतदान चालले असल्याची माहिती त्यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.