Pune News: जिल्हा प्रशासनाकडून 500 आपत्ती मित्रांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

एमपीसी न्यूज : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली यांच्याकडून राज्यातील 20 जिल्ह्यामध्ये आपत्ती मित्रांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्याच्या योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातून 500 स्वयंसेवकांसाठी 16 डिसेंबरपासून प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल सुदुंबरे, मावळ या ठिकाणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी विविध तालुक्यातून ५०० आपत्ती मित्रांची निवड करावयाची आहे. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये कार्य करण्यास इच्छुक असणारे युवक-युवतीं, माजी सैनिक, राष्ट्रीय सेवा योजना आणि एनसीसीचे विद्यार्थी, नेहरू युवा केंद्राचे युवक-युवती, होमगार्ड, पोलीस मित्र, वनमित्र, नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक तसेच विविध संस्थेचे युवक-युवती नाव नोंदणी करू शकतात.

Baramati News: शाईफेक करून निषेध करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही- अजितदादा पवार

प्रशिक्षणासाठी इच्छुक स्वयंसेवकाचे वय 18 वर्षे ते 40 वर्षापर्यंत असावे. प्रशिक्षणार्थी 12 दिवसांचे निवासी प्रशिक्षण पूर्ण करण्यास तयार असावा. प्रशिक्षणानंतर प्रशासनास आपत्कालीन प्रसंगी सहकार्य करण्यास तयारी असावी. आपत्ती मित्रांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यात येवून त्यांचा 5 लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविण्यात येणार आहे.

इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 020-26123371 किंवा 9370960061 या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी संबंधित तहसिलदार कार्यालयात नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.