Dehuroad Crime News : किरकोळ भांडणाच्या कारणावरून चौघांवर खुनी हल्ला; सहा जणांना अटक

एमपीसी न्यूज – किरकोळ झालेल्या भांडणाच्या कारणावरून सात जणांनी मिळून चौघांवर खुनी हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री पारशी चाळ, देहूरोड येथे घडली. पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

वीर शाम डुलगज (वय 18, रा. पारशीचाळ, देहूरोड), त्यांचे चुलते संदीप डुलगज, आत्या दीपा भिगानिया, आजोबा रामकिशन डुलगज अशी जखमींची नावे आहेत. वीर डुलगज यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अनिल रोहिदास टाक (वय 33), सुनील उर्फ गुगा रोहिदास टाक (वय 31), हरीश रोहिदास टाक (वय 30), तीन महिला आणि अन्य दोघेजण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपी अनिल टाक याने पालघनने फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर वार केले. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. त्यांनतर आरोपींनी फिर्यादी यांचे चुलते, आत्या आणि आजोबा यांच्यावर देखील पालघन, हॉकी स्टिक, तलवार, सत्तूर, दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.