Pune News : होळीनिमित्त पुण्यातून एसटी महामंडळ कोकणात सोडणार 62 जादा बसेस

एमपीसी न्यूज : होळी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. होळीसाठी अनेक जण कोकणाची वाट धरतात. कोकणातील होळीनिमित्त साजरा होणारा शिमगा प्रसिद्ध आहे. या शिमग्यासाठी राज्यभरातील अनेक चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी (Pune News) 62 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 3 ते 6 मार्च दरम्यान या गाड्या कोकणातील मार्गावरून धावणार आहेत.

पुढील महिन्यात म्हणजेच 6 मार्च रोजी होळी आहे तर, 7 मार्च रोजी धुलिवंदन आहे. त्यामुळे होळीच्या दोन दिवस अगोदरच चाकरमानी कोकणात जातात. गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी पुण्यातून चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली असून महामंडळाने पुण्यातून यंदा जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वारगेट आणि पिंपरी-चिंचवड स्थानकातून या जादा (Pune News) बसेस सोडणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. चिपळूण, दापोली, खेड, गुहागर, महाड या बस स्थानकात पुण्यातून जादा बस सोडण्यात येणार आहे.

Mahalunge : शिवीगाळ करत डोक्यात मारला हातोडा

मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरीवली, ठाणे, वसई, नालासोपारा तसेच पनवेल येथील बसस्थानकांतून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण आदी ठिकाणांसाठी या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. कोकणवासियांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

नियमित बसेस व्यतिरिक्त 250 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या अतिरिक्त बसेस 3 ते 12 मार्च 2023 दरम्यान कोकणातील मार्गावरुन धावणार आहेत, (Pune News) अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसेसमधून प्रवास करावा, असे आवाहनही महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

आगाऊ आरक्षणासाठी एसटी महामंडळाच्या https://msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच Msrtc Mobile Reservation App तिकीट आरक्षित करता येईल. त्याशिवाय, एसटी आगारातून ही या विशेष बसेससाठी तिकीट आरक्षण करता येईल. सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसेसमधून प्रवास करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.